Monday, March 23, 2009

Dedicated TO My School Frds....

मैत्री म्हटली की
आठवत ते बालपण
आणि मैत्रीतून मिळालेल
ते खरखुर शहाणपण

कोणी कितीही बोलला तरी
कोणाच काही ऐकायच नाही
कधीही पकडले गेलो तरी
मित्रांची नाव सांगायची नाही

मैत्रीच हे नात
सगळ्या नात्यात श्रेष्ठ
हे नात टिकवण्यासाठी
नकोत खूप सारे कष्ट

मैत्रीचा हा धागा
रेशमापेक्षाही मऊ सूत
मैत्रीच्या कुशीतच शमते
मायेची ती सुप्त भूक

मैत्रीच्या सहवासात
श्रम् सारे विसरता येतात
पण खरे मित्र मिळवण्यासाठी
काहीदा कितीतरी पावसाळे जातात

मैत्री म्हणजे
रखरखत्या उन्हात मायेची सावली
सुखाच्या दवात भिजून
चिंब चिंब नाहली

मैत्रीचे बंध
कधीच नसतात तूटणारे
जुन्या आठवणीना ऊजाळा देऊन
गालातल्या गालात हसणारे .......

रक्ताच नात सुध्दा क्षणात तूट्त !
आपलाच मन आपल्या मनाला तिट्ता
माझ्या मनाला एकच नात पटत
तुझ्यासारखा मित्रा असायला
एखाद्याच नशीबच असाव लागत्

Who i am....

मी कोण?
मी एक थेंब.......
जीवनाच्या पावसाबरोबर येणारा.........
आयुष्याच्या पानावर विसावणारा............
काही क्षण विसावून ओघळून जाणारा........
दुसर्‍या थेंबाशी एकरूप होणारा............
कोवळ्या उन्हात मोत्यासारखा चमचमनारा..........
क्षणभराच्या अस्तितवानेही दुसर्‍यांना आनंद देणारा...........
अन जाता जाता अनेक क्षणांची आठवण ठेवून जाणारा